ही औषधे टिकाऊ स्वरूपात ठेवता येतात. ही औषधे सहाणेवर उगाळून त्यांचे सूक्ष्म अंश बाळाला रोज चाटवता येतात.बाळाची छाती कफाने भरत असल्यास वेखंड वापरावे. स्वच्छ दगडावर मध (एक चमचा) टाकून वेखंडाची कांडी त्यात उगाळून तयार करावे. हे चाटण बाळास चाटवल्यास बाळाला चिकट फेसकट उलटी होऊन छातीतील फेसकटपणा कमी होतो.छाती भरत असेल तर वेखंड व काकडशिंगी उगाळणे किंचित वाढवावे. कधीकधी बाळाला शी होताना खडा झाल्याने कुंथावे लागते. यासाठी रोजच्या उगाळण्यामध्ये बाळहिरडा अधिक उगाळावा व चिंचोका उगाळू नये.