गुटीचा फायदा हा की बाळाच्या छोट्या आजारांवर घरगुती स्वरूपात हे उपचार केले जाऊ शकतात.परंतु उगाळून दिल्या जाणाऱ्या गुटी बाबत स्वच्छतेची अतिशय काळजी घ्यायला लागते.बाळाला सांभाळणे हे जणू तेलाने भरलेल्या भांड्याला घेऊन जाण्याइतके कठीण असते.त्यामुळे कुठूनही जराही जंतूंचा शिरकाव जर बाळाच्या शरीरात झाला तर मोठी समस्या उभी राहू शकते.