बाळगुटी पुस्तक मराठीमध्ये छाती भरत असेल तर वेखंड व काकडशिंगी उगाळणे किंचित वाढवावे. कधीकधी बाळाला शी होताना खडा झाल्याने कुंथावे लागते. यासाठी रोजच्या उगाळण्यामध्ये बाळहिरडा अधिक उगाळावा व चिंचोका उगाळू नये. बाळाला पातळ शी होत असल्यास खारीक, बदाम बाळहिरडा कमी करून किंवा वगळून जायफळ, चिंचोका, यांचे उगाळणे अधिक करून चाटण द्यावे. पोटात दुखण्यामुळे पोटाकडे हात नेऊन बाळ थांबून थांबून रडते. असे असेल तर मुरुडशेंग अधिक उगाळावी; जायफळ, चिंचोके, बदाम हे उगाळू नयेत. लहान मुलांना जुलाब, शी चे खडे, छाती भरणे, यांसारखे अनेक त्रास होत असतात. यासाठी सूक्ष्म प्रमाणात दिलेल्या औषधांनी वेळीच सुधारणा घडवता येते.