बाळगुटी पुस्तक

बाळगुटी म्हणजे बाळाच्या प्रकृतीला उपयुक्त अशा औषधांचा संग्रह.बाजारात 2 प्रकारची बाळगुटी मिळते, एक असते ती सिरप स्वरूपात, व एक असते ती मूळ वनस्पतींच्या भागांच्या संग्रह स्वरूपात.सिरप स्वरूपातील गुटी ही द्यायला अतिशय सोपी असते.बाळाच्या रोजच्या सुदृढ वाढीसाठी त्याचा चांगला उपयोग होतो.जी गुटी उगाळून दिली जाते त्यामध्ये जवळ जवळ 20-30 औषधे, त्यांच्या मूळ किंवा काष्ठ स्वरूपात दिले जातात.त्यामधील आपल्याला हवी असलेली औषधे उगाळून ही गुटी बनवली जाते.