बाळगुटी साहन

गुटी ही साधारणपणे बाळ सकाळी उठल्याउठल्या द्यावी.सर्वप्रथम 5-10 मिनिटे उकळलेल्या पाण्याने सहाण स्वच्छ धुवून घ्यावी.मातृ स्तन्याचे साधारण 10-12 थेंब त्यावर टाकावेत.नंतर उगाळून द्यावयाची द्रव्ये धुवून मग ती त्यात उगाळावी. त्याच उकळत्या पाण्याने स्वच्छ धुतलेल्या चमच्यामध्ये ते दूध घेऊन बाळाला गुटी पाजावी.
साधारणपणे रोज दिल्या जाणाऱ्या गुटी मध्ये खारीक, बदाम, अश्वगंधा, वेखंड, हळद देऊ शकतो.ह्या सर्व द्रव्यांबरोबर सोन्याचे वळे ही जर उगाळले तर बाळाच्या प्रतिकारशक्तीवर अतिशय उत्कृष्ट परिणाम झालेला दिसून येतो.