बाळगुटी चे फायदे
यात विविध प्रकारच्या औषधी वनस्पतींचा समावेश असतो आणि त्यातील औषधी तत्वे बाळाच्या शरीराला सक्षम करतील असं त्यामागाचा हेतू असतो. बाळगुटीमध्ये असणाऱ्या विविध औषधी वनस्पतींमुळे त्यात विविध प्रकारचे औषधी गुणधर्म आढळून येतात. काही पालक बाळ जन्मताच पहिल्या दिवसापासून त्याला बाळगुटी पाजायला सुरुवात करतात. असं म्हणतात की बाळगुटी पाजल्याने बाळाची रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि दात येताना किंवा अतिसार व बद्धकोष्ठता झाल्यावर त्याला ज्या वेदना होतात त्या बाळगुटीच्या सेवनाने होत नाहीत.जर बाळ वारंवार रडत असेल तर त्याला शांत करण्यासाठी तुम्ही बाळगुटी पाजू शकता. दात आल्यावर हिरड्यांमधील सूज आणि बाळाला होणाऱ्या वेदना कमी करण्यासाठी सुद्धा बाळगुटी बाळाला देऊ शकता. याशिवाय बाळाचे पोट फुगले वा त्याला अपचन होत असेल तर बाळगुटी दिली जाते. जेणेकरून त्याच्या पचनक्रियेत सुधारणा होईल. याशिवाय बाळाची रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी आणि बाळाचे आरोग्य सुदृढ राहावे म्हणून बाळाला बाळगुटी देण्याचा सल्ला दिला जातो.