सुंठ म्हणजे वाळवलेले आले. याचे आतून पांढुरके व बाहेरून फिकट पिवळे असे हाताच्या बोटांप्रमाणे कंद असतात. सुंठीने पचनक्रिया सुधारते व पोटात वायुचा संचय होत नाही. लहान मुलांना वारंवार होणारे अपचन, गॅसेस, ढेकरा, पोटदुखी यावर सुंठीसारखे औषध नाही. पावसाळ्यात होणाऱ्या सर्व तक्रारींवर तर हे एकटेच पुरेसे होते. म्हणून तर संस्कृतमध्ये त्याला विश्वौषधी असे नांव आहे.