Delivery time:5-7 Days
  • Description
  • More

वेखंडाच्या कंदाला उग्र वास असतो. मुलांची मेधा व आकलनशक्ती वाढवण्यासाठी तसेच उच्चार स्पष्ट होण्यासाठी हे उत्तम असते. वेखंडामुळे जंतुसंसर्गाची शक्यताही कमी होते. सर्दी, खोकला वारंवार होण्याच्या प्रवृत्तीला व जंत होण्याला आळा बसतो. याचेही जास्तीत जास्त पाच-सहा वळसे घ्यावेत.

वेखंड ही एक सुगंधी आणि थोडीशी उग्र वासाची वनस्पती आहे. आयुर्वेदात ह्या वनस्पतीचा उपयोग प्रामुख्याने कृमिनाशक म्हणून करण्यात येतो. कृमी म्हणजे निरनिराळ्या प्रकारचे जंत अशी आपली समजूत असते. परंतु आवेसारख्या दुखण्यांचे जंतू, निरनिराळ्या प्रकारचे ताप निर्माण करणारे रोगजंतू इत्यादी प्रकार कृमीमध्येच गणले जातात. ह्या वेखंडाचा उपयोग अशा प्रकारचे जंतू नष्ट करण्यासाठी होतो. ह्यासाठी, तसेच ह्या निरनिराळ्या रोगजंतूंपासून संरक्षण होण्यासाठी ह्या वेखंडाचा उत्तम उपयोग होतो. कृमिनाशाप्रमाणेच वेखंडाचा उपयोग पचनाची क्रिया आणि पोटातील
अग्नी प्रज्वलित करण्यासाठी होतो. बाळाला जन्मत:च दात नसतात. साधारण सातव्या महिन्यापासून हिरड्या कडक होऊन दात बाहेर येण्याची क्रिया सुरू होते. ह्या दात येण्याच्या काळात बाळाला त्रास होतो. हा त्रास वेखंडाने कमी होतो. ह्या सर्व गुणधर्मांमुळे वेखंडाचा वापर बाळगुटीच्या औषधांत केला गेला आहे.
वेखंड आणि इतर बाळगुटी चे साहित्य

सागरगोटा


वावडिंग

अश्वगंधा


सुंठ


बदाम

खारीक

मायफळ


बाल हिरडा

कुडा

वेखंड


मुरुड शेंग

डिकेमाली

हिरडा

हिरडा

अतिविष

अतिविष

नागरमोथा

नागरमोथा

ज्येष्ठमध

ज्येष्ठमध

काकडशिंगी

काकडशिंगी

बेहडा

बेहडा

पिंपळी

पिंपळी

जायफळ

जायफळ

शतावरी

शतावरी

डाळिंबाची साल

डाळिंब साल

चिंचोका Chinchoka

चिंचोका

हळकुंड

हळकुंड


वेखंडाचे बोटासारखे कंद उग्र सुगंधी असतात. त्यावर गाठी असतात. वेखंड उत्तेजक आहे. त्याने तरतरी येते. संस्कृत नाव वचा म्हणजे वाचाशक्ती सुधारणारे. बाळ लवकर व निर्दोष बोलु लागण्यास व उत्साही होण्यास वेखंडाचा उपयोग होतो. वेखंडाने कफ सुटून आवाज सुधारतो, घशातील व श्वसननलिकेतील सूज व जंतूसंसर्ग कमी होतो. तापातही उपयोगी पडते. आंघोळीनंतर वेखंडाची पूड बाळाच्या अंगाला पावडर प्रमाणे लावतात. त्याने कफ, सर्दी होत नाही, जंतु संसर्ग होत नाही आणि इडापिडाही टळते असा समज आहे.

सागरगोटा


वावडिंग

अश्वगंधा


सुंठ


बदाम

खारीक

मायफळ


बाल हिरडा

कुडा

वेखंड


मुरुड शेंग

डिकेमाली

हिरडा

हिरडा

अतिविष

अतिविष

नागरमोथा

नागरमोथा

ज्येष्ठमध

ज्येष्ठमध

काकडशिंगी

काकडशिंगी

बेहडा

बेहडा

पिंपळी

पिंपळी

जायफळ

जायफळ

शतावरी

शतावरी

डाळिंबाची साल

डाळिंब साल

चिंचोका Chinchoka

चिंचोका

हळकुंड

हळकुंड

Related Products