जीवन बाळगुटी
बाळगुटी बाळ वर्षाचे होईपर्यंत सर्व ऋतुंना, बाहेरील हवापाण्याला प्रथमच सामोरे जात असते. अपचन, पोट बिघडणे, कृमी-जंत, सर्दी, खोकला, ताप, दात येतानाचा त्रास अशा सर्वसाधारण तक्रारी असतात. घरच्या घरी किरकोळ तक्रारी दूर करून बाळाच्या अंगी लागेल अशी योजना म्हणजे बाळगुटी. बाळगुटी हा २० आयुर्वेदिक गुणकारी वनौषधींचा संच आहे. दररोज प्रत्येक वनौषधी सहाणेवर दुधात किंवा पाण्यात उगाळून तो लेप एकत्र करून चाटवावा. त्यालाच बाळगुटी असे नाव आहे. वर्षभर पर्यंत दर महिन्याला १-१ वळसा वाढवावा. गरजेप्रमाणे त्यातील वनौषधी व वळसे कमी जास्त उगाळून दिले तरी चालते. बाळगुटीला शेकडो वर्षांची परंपरा आहे. ती पूर्णपणे सुरक्षित आहे. बाळाच्या किरकोळ तक्रारींवर बाळगुटीतील विशिष्ट वनौषधींची योजना करावी.