दररोज प्रत्येक वनौषधी सहाणेवर दुधात किंवा पाण्यात उगाळून तो लेप एकत्र करून चाटवावा. वर्षभर पर्यंत दर महिन्याला १-१ वळसा वाढवावा.बाळगुटीतील वनौषधी ताज्या, पोसलेल्या व खडखडीत वाळलेल्या असाव्यात. दररोज लागतील त्या वनौषधी धुऊन घ्याव्यात. उगाळाव्यात. नंतर पुन्हा वाळवून, पुसून ठेवाव्यात. ओलसर राहिल्यास बुरशी लागते, किडतात. हे होऊ नये म्हणून अधूनमधून खडखडीत वाळवाव्यात, म्हणजे वर्षभर टिकतील. सागरगोटा, मुरूडशेंग, मायफळ, कुडा, वेखंड, डिकेमाली, हिरडा, बाळहिरडा, अतिविष, हळकुंड, जायफळ, नागरमोथा, सुंठ, पिंपळी, बेहडा, काकडशिंगी, ज्येष्ठमध, अश्वगंधा, खारीक व बदाम अशा २० वनौषधी मिळून बाळगुटी तयार होते.